Civics Mahrashtra

कासेगाव येथील शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आमरण उपोषण सुरु

Share

पंढरपूर :

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत असणाऱ्या सातवा मैल नजीक जलसंपदा विभागाचा नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, शाखा पंढरपूर फाटा क्रमांक १४ समोर कासेगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. कासेगाव परिसरातील अडीचशे एकर क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा जलसंपदा विभागाच्या नीरा उजवा कालवा कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी लगेच मिळणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना थांबवले

परंतु वारंवार शेतकरी पाण्यासाठी अर्ज करत असल्याचे पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी एक ते तीन तारखेपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र, आज १३ तारीख उलटूनही पाणी येत नसल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. फळबागेचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.

Related posts

श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरंध एच .एस. सी .परीक्षा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.

editor

कल्याणमधील अनधिकृत पब आणि बारवर केडीएमसीची कारवाई

editor

रात्रभर मोहीम राबवत नवी मुंबईतील ४१ अनधिकृत हॉटेल, बार, पबवर धडक कारवाई

editor