Civics Mahrashtra politics

कीर्तिकरांचा सदैव सेवेसाठी तत्पर राहण्याचा वचननामा

Share

मुंबई :
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आपल्या वचननाम्यात रेल्वे प्रवासी संघाचे प्रलंबित प्रश्न, वन जमिनीवरील रहिवाश्यांच्या पुर्नविकासाचा प्रश्न, जोगेश्वरीतील गुंफा संवर्धन, वर्सोवा कोळीवाडयाचे प्रलंबित प्रश्न, कोळीवाडयाच्या पुर्नविकासासाठी विकास नियंत्रण नियमावली, त्याशिवाय वसोंवा लोखंडवाला परिसरात कायमचे – टपाल कार्यालये आदी प्रश्न सोडिवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे वचन दिले आहे.


वचननाम्यातील इतर काही महत्वाचे मुद्दे वर्सोवा अंधेरी भागातील मच्छीमारबांधवांना डिझेलचे परतावे त्वरीत मिळवून देण्यासाठी आणि कोळीवाडयाचे सीमांकन करण्यासाठी पाठपुरावा करणार अधेरी पूर्व येथील कामगार रुग्णालय अद्यायावत करण्यासाठी प्रयत्न. समर्थ नगर लोखंडवाला यारीरोड याविभागासाठी नवीन अग्नीशमन केंद्राची उभारणी करणार, हृदयरोग कैन्सर सारख्या दुर्धर आजारांवर अल्पदरात उपचार मिळण्यासाठी ‘एम्स’ च्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालयाची उभारणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बाधीत झोपडपट्टीधारकांचे पुर्नवसन, केंद्र व राज्य सरकारच्या स्वयं रोजगार व अन्य लोकाभिमुक योजना मतदारसंघात राबवणार. मतदारसंघातील अनेक जुन्या इमारती व झोपडपट्या जाचक अटींमुळे आणि अंतर्गत वादामुळे त्यांची पुर्नवसनाचे प्रकल्प रखडले आहेत.

त्यातील अडथळा दूर करुन पुर्नवसनासाठी योग्य तो पाठपुरावा करणार मतदारसंघातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस विभागाशी समन्वय साधणार कबड्डी व शरीर सौष्ठवसारख्या खेळांसाठी मतदारसंघामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जवि अद्यायावत क्रीडा संकुल उभारणार,
त्या शिवाय महाविकास आघाडी आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा पूर्ण करण्यासाठी कटीबध्द आहे असे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी प्रसिध्द केलेल्या वचननाम्यात म्हटले आहे.

Related posts

आर टी ई शाळांची सरकारकडे अडीच हजार कोटी थकीत ; गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

editor

Disappearance of Bangladeshi MP in Kolkata Raises Concerns

editor

आता आदेश नाही, मैदानात उतरा अन् ठोकून काढा फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश

editor

Leave a Comment