accident Mahrashtra

टॅक्सी विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा

Share

जालना प्रतिनिधि, दि.१९ :

राजुर रोडवरील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळली, यात ७ सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .या दुर्दैवी अपघातामुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. जालनातल्या राजूर येथील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर ८ जण जखमी आहेत .

मिळालेल्या वृत्तानुसार , दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आणि त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. टॅक्सी मध्ये १२ प्रवासी होते. पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते. त्यादरम्यान जालनातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळी टॅक्सीचा अपघात घडला. दुचाकीला वाचवन्याच्या प्रयत्नात काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांचा जीव वाचला आहे .त्या आठ जणांवर जालन्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले .दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे .

जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ , पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल ,चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फ़ौजफाट्यासह घटनास्थळावर दाखल झाले . यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्यासह अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदत कार्य केलय.

जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी येथे घडलेला अपघात दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आमदार नारायण कुचे यांनी दिलीय.त्यांनी चणेवाडी येथील अपघात स्थळी पाहणी केलीय.या घटनेमुळे अंबड बदनापुर विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली असून ती न भरणारी असल्याची प्रतिक्रिया कुचे यांनी दिली.मुख्यमंत्री सहायता निधीतून जी काही मदत जखमी आणि मयातांना करण्यात येईल ती मदत मी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कुचे म्हणाले.

प्रल्हाद महाजन, रा.चनेगाव, ताराबाई मालुसरे, रा.तपोवननंदा तायडे, रा.चनेगाव, प्रल्हाद बिटले, रा. चनेगाव, नारायण किसन निहाळ, रा. चनेगाव, चंद्रभागा घुगे रा.चनेगाव, रंजना कांबळे रा. जालना अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.

Related posts

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

editor

शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करत एटीएम मशीन जाळण्याची घटना

editor

कोल्हापुरात मुसळधार पाऊस,पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

editor

Leave a Comment