Civics Mahrashtra

महिला स्वच्छताकर्मींनी केला मतदानाचा निर्धार व इतरांनाही केले मतदानाचे आवाहन

Share

नवी मुंबई :


ठाणे लोकसभा निवडणूकीचे मतदान सोमवारी २० मे रोजी असून त्यामध्ये प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावणेबाबत स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृती करण्यात येत आहे

.
यामध्ये विविध घटकांना सामावून घेतले जात असून जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला स्वच्छताकर्मींच्या आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी उपस्थित शंभरहून अधिक स्वच्छतासखींना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी मतदानाचे महत्व सांगितले. तसेच प्रत्येक स्वच्छतासखींनी आपला मतदानाचा हक्क बजावावा तसेच कुटुंबियांनाही बजाविण्यास सांगावे असे आवाहन करण्यात आले.


याप्रसंगी सर्व स्वच्छतासखींनी ज्या डाव्या हाताच्या बोटावर मतदान केल्याची खूण अर्थात शाई लावण्यात येणार आहे ती तर्जनी उंचावून मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला व आमच्यासारखाच सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे प्रतिकात्मक आवाहन केले.

Related posts

मुंबई-गोवा महामार्गाची खासदार सुनिल तटकरे यांनी केली पाहणी

editor

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याने महसूलमध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ

editor

सोळा जीव घेतल्यानंतरही रेल्वेला गांभीर्य नाही

editor

Leave a Comment