Mahrashtra

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

Share

मुंबई, दि. 6 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

पाचव्या टप्प्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे : धुळे लोकसभा मतदारसंघात 18, दिंडोरी – 10 , नाशिक – 31, पालघर – 10, भिवंडी – 27, कल्याण – 28, ठाणे – 24, मुंबई उत्तर – 19, मुंबई उत्तर पश्चिम – 21, मुंबई उत्तर पूर्व  – 20, मुंबई उत्तर मध्य – 27, मुंबई दक्षिण मध्य – 15 आणि मुंबई दक्षिण –  14 अशी आहे. या 13 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.

Related posts

विधानसभेच्या तयारीसाठी भाजपची शुक्रवारी बैठक : देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

editor

आमदार नागपूर विमानतळावर अडकले

editor

प्रिन्सटन टाऊन को-ऑप हौसिंग सोसायटीबाबत छायांकित प्रतीच्या आधारे मुद्रांक शुल्क करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

editor

Leave a Comment