Uncategorized

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्षांसाठी २४ तास पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वन विभागाने तयार केले १७ कृत्रिम पाणवठे

Share

यंदा कर्नाळा पक्षी अभयारण्याला देखील उष्णतेचा फटका बसला आहे. मात्र वन विभागाच्या योग्य नियोजनामुळे अभयारण्यातील पक्षांवर भटकंती करण्याची वेळ येणार नाही. कारण अभयारण्यात पक्षांना पाणी मिळावे यासाठी वन विभागाने १७ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. हे पाणवठे २४ तास पाण्यांनी भरतील असे नीयोजन देखील वन विभागाने केले आहे.

सुमारे १३४ प्रजातीचे स्थानिक तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतात. तसेच या कृत्रिम तलावाबरोबर सिमेंटचे एकूण ३ बंधाऱ्यांपैकी एका बंधाऱ्यात पाणी उपलब्ध आहे. यंदा उष्णता जास्त असली तरी कर्नाळा अभयारण्यात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. तसेच काही आवश्यक असलेल्या जागांवर पाणी नसल्याने यंदा देखील १७ कृत्रिम पाणवठे उभा केले असून, आमचे कर्मचारी स्वतः हे पाणवठे भरून पक्षांना पाणी उपलब्ध करून देत आहेत अशी प्रतिक्रिया वन क्षेत्रपाल नारायण राठोड यांनी दिली आहे.

Related posts

युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात कचरा फेकून आंदोलन

editor

अजित पवारांचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश

editor

ठाणे जिल्हा डिजिटल मिडिया संपादक – पत्रकार संघटनेची सभा संपन्न

editor

Leave a Comment