politics

काँग्रेसच्या नेत्यांमधील हेवे दाव्यांवर पक्षश्रेष्ठी नाराज …महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या कानपिच्क्या

Share

मुंबई प्रतिनिधी , दि. २१ :

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मध्ये सर्वात जास्त जागा जिंकत काँग्रेस मोठा भाऊ म्हणून समोर आला आहे. परंतु याच महाराष्ट्र काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात असल्याने काँग्रेसच्या दिल्लीतून आलेल्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले असल्याचे सूत्रांकडून कळते.

गटातटांना थारा नाही…

शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेस तसेच महाराष्ट्र प्रभारी यांच्या वतीने काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकी संदर्भात विचार विनिमय करण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक गट, बाळासाहेब थोरात यांचा वेगळा गट, पश्चिम महाराष्ट्रातून बंटी पाटील तसेच विश्वजीत कदम यांचा वेगळा गट तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मानणाऱ्या आमदारांचा एक वेगळा गट या सर्व गटागटाच्या अंतर्गत राजकारणावर दिल्लीहून आलेल्या नेत्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जर पक्षाला मोठे यश संपादन करायचे असेल तर अशा गटातटांना काँग्रेसमध्ये थारा दिला जाणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींनी बोलून दाखवले.

याआधी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तसेच नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात देखील पक्षाच्या काही आमदारांनी तसेच नेत्यांनी दिल्लीपर्यंत जाऊन तक्रार केल्याचे समोर आले होते.

Related posts

भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ – प्रकाश आंबेडकर यांची टीका

editor

PM Modi Criticizes OBC Verdict; Mamata Plans Legal Action

editor

Gaza’s Rafah Tragedy: International Outcry After Deadly Israeli Strike

editor

Leave a Comment