मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनानुसार, गुरुवारी सकाळी ७:१५ वाजता पुणे ते मुंबई असा प्रवास सुरू करणाऱ्या डेक्कन क्वीनला कर्जत-खंडाळा मार्गावरील उतरणीजवळ सिग्नलची वाट पाहत असताना सुमारे साडेआठ वाजता ही घटना घडली दरम्यान एका डब्यातून धूर निघत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.
प्रवाशांनी तात्काळ खाली उतरून ऑनबोर्ड गार्डला सूचित केले. तपासणी केली असता एका डब्याच्या चाकात आग लागल्याचे समोर आले. सुदैवाने, गार्डने जलद कारवाई केल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले.
, रेल्वे प्रवासी ग्रुपचे , चेअरमन, हर्षा शहा, यांनी माहिती दिली की, पुणे मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला खंडाळा घाटात आग लागली कारण ही आग घर्षणामुळे एसी डब्यांना लागली. त्यामुळे पुढील दुर्घटना रोखण्यासाठी रेल्वे थांबवण्यात आली. निकृष्ट दर्जाच्या रेकच्या विरोधात बदल करणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रेल्वेचे नूतनीकरण करावे असेही त्यानी पुढे संगितले
रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून असे दिसून येते की पुण्यापासून मुंबईकडे जाणा-या चढत्या उतारामुळे जास्त घर्षण झाले असावे, परिणामी ब्रेक बाइंडिंग झाले आणि नंतर चाकांवर रबर पेटला.
