Civics Mahrashtra

पुण्यात बेकायदेशीर होर्डिंगची तपासणी करुन कारवाई करणार – बाळासाहेब ढवळे

Share

पुणे :

पुण्यातदेखील गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सुदैवाने अद्याप कोणतेही होर्डिंग कोसळले नाही. परंतु महानगरपालिकेकडून पाहणी अथवा सर्वेक्षण करणे अपेक्षित असतानाही ते करण्यात आलेले नाही. महानगरपालिकेच्या अशा उदासीन कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

मुंबईनंतरच्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका प्रशासन जागे झाले असले तरी अनधिकृत होर्डिंगवर खरंच कारवाई करणार की नेहमीप्रमाणे अहवालांचा खेळ खेळला जाणार, असा प्रश्न पुणेकरांकडून आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारले गेलेले होर्डिंग अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. जुना बाजार चौकात रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली होर्डिंग्ज काढत असताना ही घटना घडली होती. रेल्वे प्रशासनाकडून हे होर्डिंग्ज काढण्याचे काम केले जाते होते. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

या घटनेनंतर शहरातील होर्डिंगबाबत कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता .त्यावरच उपाय योजन केले जाणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका सहाय्यक बाळासाहेब ढवळे यांनी दिले आहे. पुढील सात ते आठ दिवसात अनधिकृतपणे उभारले गेलेल्या होर्डिंग्ज ची तपासणी पुर्ण होईल असेही ढवळे यांनी सांगितले आहे.

Related posts

डोंबिवली एमआयडीसी कंपन्यांच्या स्थलांतरणाचा निर्णय घेताना इतर बाबींचा देखील विचार करणे आवश्यक-रविंद्र चव्हाण

editor

Supreme Court Orders Release of NewsClick Editor Prabir Purkayastha, Declares Arrest Illegal

editor

Thane Police Seize Illegal Weapons Ahead of Lok Sabha Elections

editor

Leave a Comment