Civics Mahrashtra

मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना: ढिगाऱ्याखाली आणखी दोन मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या १६ वर

Share

मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली आणखी दोन मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या १६ वर पोहोचली आहे, तर ८८ जण जखमी झाले आहेत अजूनही येथे बचाव कार्य सुरू आहे

मुंबईतील घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर एक मोठा होर्डिंग कोसळल्याच्या ठिकाणी ढिगार्‍याखाली आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आता१६ वर पोहोचली आहे. घटनास्थळी आजही शोध व बचाव कार्य मोहीम सुरू आहे तर आणखीही काही लोक या होर्डिंग खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या वृत्तानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका ४० फूट उंच होर्डिंगला परवानगी देते मात्र घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर पडलेला होर्डिंग हा १४० फूट उंचीचा होता अशा महाकाय डिस्प्ले बोर्डाचा पाया किमान सात फूट किंवा आठ फूट असावा लागतो परंतु या होर्डिंगला फक्त तीन फुटाचा पाया केलेला होता. त्यामुळे जोराच्या वादळी वाऱ्यात आणि अवकाळी झालेल्या पावसात तो कोलमडून पडला.

दरम्यान रेल्वे अधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये या दुर्घटनेनंतर एकमेकांवर दोषारोप करण सुरु झालं आहे .या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान घटनास्थळी छोटी आगही लागल्याचा प्रकार घडला परंतु तेथे तैनात असलेल्या अग्निशमन दलाने ते तात्काळ आटोक्यात आणल्याने अजून काही दुर्घटना होण्याचे टळले असल्याचे एनडीआरएफ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली त्या ठिकाणी आयुक्त गगराणी यांनी आज भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली, संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी दुर्घटनेशी संबंधित तपशील जाणून घेतले आहेत. तसेच या ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता होर्डिंग उभारल्या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई सुरू केल्याचे त्यांनी सांगितले

Related posts

Successful Rescue Efforts at Rajasthan Copper Mine: All 15 Officials Safe

editor

Maharashtra Probes Porsche Crash Blood Tampering

editor

धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर

editor

Leave a Comment