कल्याण :
वासिंद रेल्वे स्थानकात लोकल थांबली असता एका महिला प्रवाशाचे गळ्यातील महागडी चैन हिसकावून एका चोरट्याने पळ काढला होता. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे.
दिनेश धुमाळ असे या चोरट्याचे नाव असून तो टिटवाळ्याला राहतो. दिनेश हा मूर्तीकार आहे. त्याच्या विरोधात यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पंधरा दिवसांपूर्वी लोकलच्या महिला डब्यात काही महिला प्रवासी प्रवास करीत होते. वासिंद रेल्वे स्थानकात लोकल थांबली होती. त्यानंतर लोकल सुरु होताच लोकलच्या दारात उभ्या असलेल्या एका तरुणाने एका महिलेची चैन हिसकावून तेथून पळ काढला.
या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरु केला. अखेर पंधरा दिवसानंतर या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
