Share
सोलापूर प्रतिनिधि,दि १९ :
एसटी चालकाला फिट येऊन तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ एसटीला हा अपघात झाला आहे.
एसटी चालकाला फिट येऊन तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या वृत्तानुसार टेंभुर्णीहून कुर्डूवाडी ला एसटी जात असताना हा अपघात घडला. एसटीमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. एसटी बसच्या चालकाला फिट आल्याने ही दुर्घटना घडली आहे. एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले.
तसेच जखमींना सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.