Education Mahrashtra

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या २१ शाखांचा दहावीचा निकाल १०० टक्के

Share

धुळे ,२८ मे :

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या २१ शाखांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून कनक पाटीलदीपक पवार हे दोन विद्यार्थी९८ टक्के गुण मिळवून धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संस्थेने व संस्थेतील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा आज प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून शिरपूर एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल, भंडारी,उमेशजी शर्मा,योगेश भंडारी, विनय भंडारी,बबन भंडारी, हे उपस्थित होते.

शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ज्ञान, कौशल्य आणि उत्तम वर्तन यामुळे यशाचा मार्ग सुकर होतो. आपल्या पाल्यांना त्यांच्या आवडीचा जीवनमार्ग निवडू द्या, पालकांनी त्यांच्या इच्छा, आकांक्षा पाल्यांवर लादू नये, असा सल्ला भंडारी यांनी सल्ला दिला. विद्यार्थ्यांना त्यांनी स्वत:मधील क्षमता ओळखा, येणाऱ्या काही वर्षांत जगाला भारतातील टॅलेंटेड मॅन पॉवरची आवश्यकता पडणार आहे. हे लक्षात घेऊन अभ्यासक्रम निवडा असे सांगितले.

संस्थेतील एकूण १७६२ विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संपूर्ण संस्थेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात सुमारे ८१४ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले असून उर्वरित सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, अकॅडमिक इन्चार्ज पी.व्ही.पाटील, सर्व प्राचार्य, शिक्षक, पालक यांनी कौतुक केले.

Related posts

ज्ञानगंगा अभयारण्यात निसर्ग अनुभव करताना पर्यटकांना दिसले ६०३ वन्यजीव

editor

मनातून अजून कोरोना न गेलेल्या त्या मतदारांना विश्वास देण्याचे काम करत आहे : खासदार राहुल शेवाळे

editor

तुडुंब भरलेल्या नाल्यातील दुर्गंधी बाबत पालिका गप्प का ?

editor

Leave a Comment