जालना , दि.5 नोव्हेंबर:
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले असून शहरातील चारही बाजूने नाकाबंदी करण्यात येत आहे. आज चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी माध्यमांशी संवाद साधत रोख रक्कम जप्ती बाबत माहिती दिली. दिनांक 4 सोमवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कन्हैयानगर येथे नाकाबंदी दरम्यान गाड्या चेक करत असताना गाडी क्र. MH.21 V 9290 इनोवा ही गाडी पोलीसांनी चेक केली असता गाडी मध्ये बसलेले गौतम जैन यांना गाडी चेक करण्याबाबत सांगून त्यांची गाडी चेक केली असता वाहनामध्ये पाठीमागील डीकीत पैसे बंडल असलेली थैली आढळून आली. त्यामध्ये १४,१५३००/- रु. रोख रक्कम आढळून आल्याने पोलिसांनी SST पथक प्रमुख S.D सपकाळ यांना फोन करुन बोलवून घेतले.
सापडलेले पैसे पोलीस ठाणे चंदनझीरा येथे जप्त करण्यात आले. रोख रकमे बाबत विचारपूस केली असता सदरील रक्कम व्यवसायाची असल्याचे गौतम जैन यांनी सांगितले. संपूर्ण रकमेचे बिल किंवा पावत्या आणण्यास पोलिसांनी सांगितले असता दुसऱ्या दिवशी एक वाजेपर्यंत त्यांनी बिल किंवा पावत्या जमा केल्या नसल्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सांगितले आहे.