Culture & Society Mahrashtra

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा

Share

मुंबई, दि. 26 :

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योगकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम कारभारी, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत वीर पत्नी यांचा सत्कार मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विविध विभागातील वैशिष्ट्यपुर्ण कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

Related posts

गोरेगाव स्थित टोपीवाला महानगरपालिका मंडईतील गाळेधारकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्यावे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश

editor

स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत आहेत…..?

editor

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी घाबरून न जाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

editor

Leave a Comment