Share
पारंपरिक शेतीला बगल देत एका शेतकऱ्याने शेवग्याची लागवड केली आहे. शेवगा लागवडीतून या शेतकऱ्याने लाखो रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी या गावातील नंदकुमार गायकवाड असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
नंदकुमार गायकवाडने आपल्या दोन एकर शेतीमध्ये शेवग्याची लागवड केली आहे. लागवडीनंतर शेवग्याचे योग्य नियोजन केले आहे. शेवगा लागवडीसाठी त्यांना 55 हजार रुपयांचा खर्च आला आहे. आता शेवगा शेंग तोडणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच लागवड खर्च वजा करता गायकवाड यांना 2 लाख रुपयांचा नफा झाला आहे.
शेंग तोडणी सुरू असून अजून यातून 3 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. पुढील पाच वर्षे या शेवगा लागवडीतून उत्पन्न मिळणार असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले आहे.
