crime national

दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटल भ्रष्टाचार रॅकेटमध्ये आणखी 2 जणांना अटक

Share
दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमधील भ्रष्टाचाराच्या रॅकेटप्रकरणी सीबीआयने आणखी दोघांना अटक केली आहे. यापूर्वी एजन्सीने रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर नऊ जणांना अटक करण्यात आली होती. यासह आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने दिल्लीच्या राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात भ्रष्टाचाराच्या रॅकेटच्या संबंधात - वैद्यकीय उपकरणे पुरवठादार आणि एक परिचारिका आणखी दोन लोकांना अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ११ झाली आहे.

अटक करण्यात आलेले बायोट्रॉनिक्सचे टेरिटरी सेल्स मॅनेजर आकर्षण गुलाटी आणि नर्स शालू शर्मा दोघेजण जण रुग्णालयातील स्टाफ आहेत सीबीआयने बुधवारी या रॅकेटचा पर्दाफाश करून नऊ जणांना अटक केली

अटक करण्यात आलेले आरोपी रुग्ण आणि वैद्यकीय प्रतिनिधींकडून लाच घेऊन भ्रष्टाचार करत होते. यात दोन हृदयरोग तज्ञ आणि तीन रुग्णालयातील सपोर्ट कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ज्यांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले होते, असे पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले.

अटक करण्यत आलेल्या आरोपींची सीबीआय चौकशी करत असल्याने आणखी ही अटक होण्याची शक्यता आहे

स्टेंट आणि इतर वैद्यकीय गरजांचा पुरवठा, विशिष्ट ब्रँडच्या स्टेंटचा पुरवठा, लॅबमध्ये वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा, लाच घेण बदल्यात रूग्णांना दाखल करून घेणे आणि बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे देणे या पाच कारणांमुळे भ्रष्टाचाराचे रॅकेट सुरू होते.

नर्स, शालू आणि लिपिक भुवल जैस्वाल यांनी एका व्यक्तीला कथितपणे धमकी दिली होती की जर त्याने त्यांना २०,००० रुपये दिले नाहीत तर ते आपल्या गरोदर पत्नीला केंद्र सरकारच्या वैद्यकीय सुविधा असलेल्या RML हॉस्पिटलमधून बाहेर फेकून देतील.

शालूने त्या व्यक्तीच्या पत्नीचे उपचार थांबवून तिला डिस्चार्ज देण्याची धमकी दिली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार त्या व्यक्तीने यूपीआयद्वारे रक्कम भरली.

अटक करण्यात आलेल्या दोन डॉक्टरांची ओळख पटली असून ते कार्डिओलॉजी विभागाचे असिस्टंट प्रोफेसर परवथगौडा आणि अजय राज प्रोफेसर, कार्डिओलॉजी विभागाचे आहेत. दोघेही आरएमएल हॉस्पिटलमध्ये काम करत होते आणि त्यांची उत्पादने आणि स्टेंट वापरण्यासाठी वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठादारांकडून लाच घेताना पकडले गेले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रजनीश कुमार हे केंद्र सरकारच्या रुग्णालयात वरिष्ठ प्रयोगशाळा प्रभारी होते.

Related posts

मुंबई मनपाच्या ढिम्म कारभारामुळे महिला गंभीर जखमी

editor

ठार मारण्याची सुपारी घेतल्याच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या ! वडगाव कोल्हाटी येथील गोळीबार घटनेचा उलगडा

editor

बुलढाण्याचा १८ महिन्यांचा अंशिक ठरला आयबीआर अचीव्हर; अंशिकच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

editor

Leave a Comment