accident national

जम्मू काश्मीर मध्ये रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू

Share

पी टी आई :

मिळालेल्या वृत्तानुसार जम्मू काश्मीरमधील सांब, पूंछ आणि रामबन जिल्ह्यात आज घडल्या चार रस्ते अपघाताच्या घटना


जम्मू पठाणकोट मार्गावर सांबा येथील पुलावर एका दुचाकीला चुकीच्या बाजूने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकी वर प्रवास करणारे सुरेशकुमार (५२)वर्ष आणि भीमगिरी( ५५) वर्ष अशा दोघांचाही मृत्यू झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास दोघे पठाणकोटच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. जम्मू कडे जाणाऱ्या ट्रकचा चालक घटनास्थळावरून पळून गेला असून त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे पोलिसांनी सांगितले.


तर पुंछ मधील सुरणकोट भागात मोहम्मद नसीर खान (२६) वर्ष हा चालवत असलेले वाहन रस्त्यावरून घसरले आणि त्याच्या घराजवळ असलेल्या १०० मीटर पेक्षा जास्त दरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुफलीयाज येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.


तसेच रामबन जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत बनीहाल कोर्ट कॉम्प्लेक्स जवळ एका वेगवान ट्रकने धडक दिल्याने सतरा वर्षीय सबुरा रफिकचा मृत्यू झाला.यात धडक देणाऱ्या ट्रक चालकाला जागीच अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले .


याच महामार्गालगत रामबन येथे झालेल्या दुसऱ्या अपघातात दलवासजवळ भरधाव येणाऱ्या ट्रकने रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने ट्रक चालक जागीच ठार झाला असून दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

Related posts

एक्झिट पोल नंतर शेअर बाजारात तेजी

editor

Mother Appeals to Police for Son’s Safety Amid Viral Video Controversy

editor

भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या ८ मजुरांना चिरडले; 2 जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी

editor

Leave a Comment