जालना :
जालना लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा मध्ये चुरशीची लढत झाली असून दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचा विजय होईल असा दावा करीत आहेत.
दरम्यान काल माजी नगरसेवक विजय चौधरी यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यावरून शहरामध्ये खळबळ उडाली होती काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कपिल भुरेवाल यांनी कमळ या बटणावर मतदान करून तसेच त्यांच्या बुथवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपला मतदान केला असल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावर केला होता. त्यावरून श्रावण भुरेवाल आणि कपिल भुरेवाल यांनी सदरील व्हायरल पोस्ट चा खुलासा केला असून मुद्दामहून काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यासाठी हा खोडसाळपणा केला असल्याचे सांगून त्यांनी विजय चौधरी यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना श्रावण भुरेवाल म्हणाले की हा मुद्दामपणे केलेला खोडसाळपणा आहे. जी पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ते दीपक भुरेवाल माझा मुलगा नसून दुसराच कोणीतरी आहे. परंतु जाणून बुजून खोडसाळपणाने त्या पोस्टचा आमच्याशी संबंध जोडून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा घाट विजय चौधरी यांनी केला आहे.
अशा पदाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच आमदार गोरंट्याल यांनी पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी श्रावण भुरेवाल यांनी केली आहे. दरम्यान या पोस्ट बाबत माजी नगरसेवक विजय चौधरी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की कोणाचीही बदनामी करण्याची आपली इच्छा नव्हती किंवा आपण जाणून बुजून पोस्ट वायरल केलेली नसून अनावधानाने आपल्याकडून पोस्ट वायरल झालेली आहे. त्यासाठी आपण जाहीरपणे माफी मागत असल्याचे विजय चौधरी म्हणाले.