नवी मुंबई :
नवी मुंबईतील भागात राहणाऱ्या एका सेवा निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला खोटे भासवून तब्बल 32 लाखांची फसवणूक केली असल्याची तक्रार सायबर सेल नवी मुंबई पोलिसांना प्राप्त झाली आहे.
आरोपी भामट्यांनी या ८२ वर्षीय सेवा निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला फोन करून, आम्ही बीएसएनएल मधून बोलत असून आपल्या आधार कार्डचा चुकीचा वापर झाले असून तुमचे दोघांचे पुलवामा आणि इतर देशद्रोही कृत्यात हात असल्याचे दिसून येत असून आपल्यावर गुन्हा दाखल झालं आहे त्यामुळे आपली चौकशी केली जाईल,या चौकशीला सामोरे जातात आपल्याला रिझर्व बँकेत काही पैसे डिपॉझिट करावे लागतील जे तुमची चौकशी संपली की परत मिळतील,असे सांगून चार वेळेत एकूण ३२ लाख रुपये त्यांच्याकडून उकळले आहेत.
दोन्ही पती पत्नी घाबरल्याने त्यांनी सायबर सेल पोलिसांना घटनाक्रम सांगितला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली आहे.