Civics Mahrashtra

सोळा जीव घेतल्यानंतरही रेल्वेला गांभीर्य नाही

Share

मुंबई / रमेश औताडे

रेल्वे परिसर व प्लॅटफॉर्म वर प्रवाशांची सुरक्षा करणे रेल्वेचे आद्य कर्तव्य आहे. मात्र याचा विसर पाडलेल्या रेल्वे प्रशासनाला कशाचे सोयरे सुतक नाही. १६ निष्पाप जीव रेल्वेने घेतले की पालिकेने घेतले की अजून कुणी घेतले यावर सध्या तज्ञ कमिटी तपास करत आहे. १६ जीव गेल्यानंतर रेल्वेने आपल्या हद्दीतील, फलाटा वरील अनधिकृत प्रकार नेस्तनाबूत करण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवायला पाहिजे होती मात्र तसे दिसत नाही.असे मत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी व्यक्त केले.

रेल्वे स्टेशन तिकीट विंडो जवळ बंद पडलेले आरोग्य केंद्र व त्या बाजूला अनधिकृत फेरीवाले यांच्या मनमानी वास्तव्यामुळे प्रवाशी सुरक्षा धोक्यात आली आहे. रेल्वे प्लॉटफॉर्म वर जे खाद्यपदार्थ स्टॉल आहेत त्यांनी रेल्वे रुळ पासून स्टॉलचे अंतर किती असावे या नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कोणतीही कारवाही रेल्वेने केली नाही. त्या स्टॉल वरील अनधिकृत बांधकाम कोसळून दुर्घटना होऊन प्रवाशी जीव जाऊ शकतात. ब्रिजवर चिंचोळ्या जागेतून ये जा करताना प्रवाशी जखमी होऊ शकतात. रेल्वे ब्रीजवर असणारे फेरीवाले यांनाही अभय दिले जात आहे. भिकारी,गर्दुल्ले, नशा करणारे प्रवाशी, भुरटे चोर, यांच्यावर रेल्वे पोलीस, होमगार्ड, शहर पोलिस, यांचा वचक राहिला नाही.प्रवाशांना धक्काबुक्की करत तृतीयपंथी, चोरटे, गर्दुल्ले बिनबोभाट प्रवास करत आहेत.

अनेक ठिकाणी नूतनीकरण सुरू आहे त्या ठिकाणी कंत्राटदार सुरक्षा पट्टी, रेड मार्किंग, सावध फ्लॅग गार्ड आदी कोणतीही काळजी न घेता मनमानी विकास कामे सुरू आहेत. रेल्वेत झिक झ्याक अवस्थेत असलेले पंखे, टुयब लाईट, गरम होऊन स्पार्क झाले तर आगाची दुर्घटना होऊन प्रवासी जीव धोक्यात येऊ शकतो. अनेक स्थानकात जंबो पंखे बंद अवस्थेत आहेत त्याची देखभाल कंत्राटदार करत नाही.

अनेक ब्रीज वर फेरीवाले जागा अतिक्रमण करून बसले असल्याने गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊ शकते.रेल्वे दरवाजे कडी कोयंडा तुटल्याने दरवाजे आदळतात त्याने अपघात होऊ शकतो. या व इतर अनेक प्रकारे रेल्वे सुरक्षा गंभीर आहे.प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत व फलाटावर उभे आहेत. त्यामुळे रेल्वेने या प्रकरणी गांभीर्ययाने लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर अजून जीव जातील व सखोल तपास समिती तपास करतच राहील.असे प्रवासी बोलत आहेत.

Related posts

चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह,सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार – मंत्री उदय सामंत

editor

.. आणि उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्टमध्ये

editor

 येवला तालुक्यातील बल्लेगाव येथील शेतकऱ्याला एसी पोल्ट्री फार्म मधून भरघोस उत्पन्न

editor

Leave a Comment