Civics Mahrashtra

‘विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे: प्रशासनाचे आवाहन

Share

मुंबई,२५ मे :

‘एस’ विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन मार्ग, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा मार्ग, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यादरम्यान जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची, पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणाऱया पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची शक्यता तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात.

या भागातील धोकादायक इमारतींना / झोपड्यांना एस विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना / नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

स्थलांतर न करता तेथेच राहणाऱया रहिवाश्यांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त यांच्या वतीने कळविण्यात येत आहे.

Related posts

यवतमाळ शहर वाहतूक पोलीसांची वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांसह कर्णकर्कश हॉर्नच्या वाहनांवर कारवाई सुरु

editor

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

नमुंमपा शाळेतील पाचवी ते दहावीच्या 21 हजारहून अधिक विदयार्थ्यांनी उत्साहात केले ‘स्वच्छता मतदान’

editor

Leave a Comment