politics

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार : मोदी सरकार मुस्लिमविरोधी नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Share

मुंबई , २५ मे :


रिपब्लीकन पक्ष देशभर भाजप एन डी ए ला मजबूतीने साथ देत आहे.उत्तर भारत ; दक्षिण भारत आणि संपूर्ण देशात मोदी सरकार बद्दल चांगले वातावरण आहे.जनतेची चांगली साथ मोदींना मिळत आहे. त्यामुळे येत्या ४ जून ला लोकसभेचा निकाल लागणार असून त्यात मोदींच्या चारशे पार च्या नाऱ्यावर विजयाचा शिक्कामोर्तब होणार आहे.काँग्रेस आणि इंडी आघाडी ने अनेक अफवा आणि दुषप्रचार केला असला तरी त्या काँग्रेसच्या अफवांचा चक्काचूर होणार आहे.नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नक्की होतील असा विश्वास आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रिपब्लिकन पक्षा तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले बोलत होते.

देशभरातील २२ राज्यांचा दौरा एन डी ए चे स्टार प्रचारक ना.रामदास आठवलेंनी लोकसभा निवडणुकीत केला आहे. देशभर भाजप एन डी ए आघाडीतील उमेदवारांचा प्रचार केला आहे .नुकताच उत्तर प्रदेश हरयाणा पंजाब दिल्लीचा दौरा ना.रामदास आठवलेंनी केला असून आज त्याबाबत ची माहिती पत्रकार परिषदेत ना.रामदास आठवलेंनी दीली.

उत्तर प्रदेशात ७५ पेक्षा जास्त जागा भाजप जिंकणार आहे.उत्तर प्रदेशात भाजप ला राष्ट्रीय लोकदल: अपना दल ; रजभर पार्टी; निषाद पार्टी चा मोठा पाठिंबा राहिला आहे.रिपब्लिकन पक्षाची मोठी साथ भाजप ला मिळाली आहे. उत्तर प्रदेशात बीएसपीचा जनाधार कमी होत असून बीएसपीतून कार्यकर्त्यांचे रिपब्लिकन पक्षात प्रवेश मोठ्या प्रमाणांत होत आहे.आगामी काळात उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्ष एक मोठी राजकीय शक्ती म्हणून उदयास येईल असा विश्वास ना. रामदास आठवलेंनी व्यक्त केला.

काँग्रेस आणि इंडी आघाडी ने सत्तेत येण्याची अनेक सप्न पहिली आहेत.चार जून नंतर मोदी जातील असे काँग्रेसच्या राहुल गांधीना स्वप्न पडत आहे.त्यांनी सत्तेत आल्यास महिलांच्या बँक खात्यात खटाखट खटाखट १लाख रुपये टाकू अशी खोटी आशा दिली आहे.मात्र काँग्रेस चे सरकार काही येत नाही.पण ते खटाखट पैसे टाकत असतील तर आम्ही महिलांना सांगू तुम्ही पटापट पटापट ते पैसे घ्या. राहुल गांधीना माझे आवाहन आहे की त्यांचे सरकार येणार नाही मात्र सरकार आले नाही तरी त्यांनी कोट्यावधी महिलांच्या खात्यावर १ लाख रुपये खटाखट टाकावेत असे सांगत ना.रामदास आठवलेंनी राहुल गांधी आणि काँग्रेस इंडी आघाडीच्या सत्ता मिळण्याचा स्वप्नांचा जनता चक्काचूर करणार असल्याचा पुनरुच्चार केला.

काँग्रेस आणि इंडी आघाडी ने दलित मुस्लिम जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे.अनेक अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र काँग्रेसला त्यात यश मिळणार नाही.


महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहून इतिहास घडविला आहे.ते या देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.संविधान कधीही कोणीही बदलू शकत नाही हे त्रिकाल सत्य आहे.मात्र तरीही संविधान बदलले जाईल अशी खोटी अफवा पसरवण्याचा आणि दलित जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा काँग्रेस इंडी आघाडीचा प्रयत्न फसला आहे.संविधान बदलण्याचा आरोप हा बिनबुडाचा आरोप आहे हे सत्य दलित जनतेला कळले असून संविधानाला कोणताही धोका नसल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशाला दिला आहे. त्यामुळे काँग्रेस इंडी आघाडीच्या खोट्या अफवांना भिक न घालता दलित मुस्लिम ओबीसी जनतेने एन डी ए सोबत महायुती सोबत राहावे असे आवाहन ना.रामदास आठवलेंनी केले.

मोदींनी देशातील १४० कोटी जनता आपला परिवार असल्याचे म्हंटले आहे.त्यामुळे ते सर्वांचे आहेत.मोदी सरकार हे मुस्लिमविरोधी नाही.मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचे चुकीचे घटनाबाह्य आश्वासन काँग्रेस देऊन घटनाविरोधी कृती करीत आहे.धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ नये ही संविधानाची भूमिका आहे. संविधानाच्या भुमिकेविरुद्ध काँग्रेस जात आहे.असा आरोप ना.रामदास आठवलेंनी केला.

Related posts

Nawaz Sharif’s Admission: Pakistan’s Violation of the 1999 Peace Agreement with India

editor

चंद्रकांत खैरे यांच्यासह दहा जण पश्चिम मधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक – भागवत कराड यांचा दावा

editor

Disappearance of Bangladeshi MP in Kolkata Raises Concerns

editor

Leave a Comment