Culture & Society Mahrashtra

स्वातंत्र्यवीर सावरकरांची सावरकर प्रेमी मंडळाकडून १०४ वी जयंती उत्साहात साजरी

Share

मुंबई,२८ मे :

पंढरपूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची सावरकर प्रेमी मंडळाकडून १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.समारंभाच्या अध्यक्षस्थानी सावरकर प्रेमी मंडळाचे मोहन मंगळवेढेकर होते. यावेळी अभयसिंह म्हणाले की, पंढरपूर मधे वीर सावरकर यांचा पुतळा व्हावा असा ध्यासच क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांनी घेतला होता. यासाठी प्रसंगी आपली ईस्टेट विका. असे मृत्युपत्रच त्यांनी केले आहे. पण भागवताचार्य वा.ना. उत्पात, कै. प्रकाशदादा उत्पात, कै. चंदूकाका कुलकर्णी यांनी पुढाकार घेउन हा पुतळा पूर्ण केला.

त्याचप्रमाणे एक कलावंत असलेल्या रणदीप हुड्डा यांनी आपल्या वाडवडिलांचे घर गहाण टाकून वीर सावरकरांवरील चित्रपट पूर्ण केला. यावेळी सर्वप्रथम आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वीर सावरकरांचे जयोस्तुते हे गीत सादर केले. सर्व मान्यवरांचे हस्ते पुतळा पुजन करण्यात आले. शांताराम कुलकर्णी यांनी सुत्रसंचालना सोबतच सर्वांना शपथ दिली. तर माजी नगरसेवक रुषीकेश उत्पात यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सावरकर प्रेमी मंडळाचे सवाई सर, डॉ. मिलींद जोशी, चंदूकाका ताठे, तसेच हिंदुमहासभा शहर अध्यक्ष विकास मोरे काका, भोले पुणेकर , विवेक बेणारे , तुकाराम चिंचणीकर उपस्थित होते.

या समारंभाला पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव , उपमुख्याधीकारी सुनील वाळुंजकर, आरोग्य अधिकारी तोडकरी यांचेसह कर्मचारी वृंद उपस्थित होता. त्यांनी न.पा. वतिने वीर सावरकर पुतळ्याला वंदन करुन पुष्पहार अर्पण केला.

Related posts

ठाण्यातील इस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत असणाऱ्या मॉल समोर भीषण अपघात

editor

Ruskin Bond’s 90th Birthday Interview Sparks Debate on Tourist Site Policies

editor

धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प – नाना पटोले.

editor

Leave a Comment