Share
मुंबई,२८ मे :
विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे. यामध्ये पदवीधर आमदार व शिक्षक आमदार यांच्या समावेश आहे.
नाशिक विभागासाठी शिक्षक आमदार विधानपरिषदेच्या जागेचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमांमध्ये ३१ मे रोजी निवडणुकीच्या अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. २६ जून रोजी मतदान होणार आहे व एक जुलैला मतमोजणी केली जाणार आहे. चोपडा तालुक्यात एकूण ९७२ मतदार आहेत गेल्या वेळेपेक्षा यावेळेस शंभर मतदारांची नोंदणी अधिक झालेली आहे.
या निवडणुकीचे मतदान केंद्र नवीन प्रशासकीय इमारतीत या ठिकाणी व्यवस्था करण्यात आले असल्याचे निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी सांगितले.