crime

टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या नावाने चंद्रपुरात देहविक्रीचा व्यवसाय

Share

मुंबई,३१ मे :

चंद्रपूर शहराच्या मध्यभागातील पॉश एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड घालून शहर पोलिसांनी एका दलाल आरोपीला अटक केली. तर, या कुंटणखान्यातून एका पश्चिम बंगालमधील युवतीची सुटका करण्यात आली. प्रणय गेडाम असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दलालाचे नाव आहे. रामाळा तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये प्रणय गेडाम यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता. या फ्लॅट मध्ये गेडाम यांनी गणराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने कार्यालय उघडले होते. या कार्यालयाच्या आड त्याने देह व्यवसाय सुरु केला होता.

या फ्लॅटमध्ये तो विविध युवतींना आणून कुंटणखाना चालवित होता. रोज नवनवे लोक येत असल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालत असल्याची कुणकुण फ्लॅटमधील नागरिकांना लागताच शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सुरुवातीला संशयित फ्लॅटमध्ये डमी ग्राहक पाठविला. खात्री पटल्यानंतर धाड घालून फ्लॅटमधून प्रणय गेडाम या युवकाला ताब्यात घेण्यात आले. यावेळी फ्लॅटमध्ये एक युवती आढळून आली. तिची चौकशी केली असता ती पश्चिम बंगालमधील असल्याचे तिने सांगितले.

तिची या कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली. तर दलाल प्रणय गेडाम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपी गेडाम ला ३० मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, शहरात गेडाम यांच्या संपर्कात असलेल्या टोळीचा पर्दाफाश या ३ दिवसांच्या कालावधीत होऊ शकतो. सदर देहविक्री व्यवसाय हा मागील दीड महिन्यापासून सुरू होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Related posts

कौटुंबिक हिंसाचार आणि पोलिसांकडून दबाव तंत्र टाकलेल्या महिलेल्या अखेर दोन वर्षानंतर मिळाला न्याय

editor

Gurmeet Ram Rahim Acquitted in Murder Case

editor

रोहिणी खडसे यांनी बोदवड पोलीस स्टेशन मध्ये पोहोचत भ्याड हल्ल्याचा केला निषेध

editor

Leave a Comment