मुंबई,३ मे :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता असताना बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठला. सेन्सेक्समध्ये ३.५५ टक्क्यांची वाढ होऊन निर्देशांक २,६२१.९८ अंकांनी वाढला आणि ७६ हजारांचा टप्पा पार केला. हा टप्पा सेन्सेक्सने पहिल्यांदाच पार केला. निफ्टीत ३.५८ टक्क्यांची वाढ झाली आणि निर्देशांक ८०७.२० अंकांनी वाढून २३,३३७ वर गेला. नंतर तो २३,००० वर स्थिर झाल्याचे दिसले.
एक्झिट पोल्सनी एनडीएच्या बाजूने बहुमताचा अंदाज दिल्यानंतर विदेशी गुंतवणूकदार पुन्हा भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (दि. १ जून) एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे.