crime

एसबीआय बॅंकचे एटीम फोडणारी टोळी जेरबंद; जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Share

मुंबई, ६ जून :

राज्यात एटीएम फोडून पोलीसांना आव्हान देणार्‍या चोरट्यांच्या तपास घेत जालना स्थानिक गुन्हे शाखेने हरियाणा येथून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. काल पहाटे पुन्हा जुना जालन्यातील गणपती गल्ली जवळील एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या तिन चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा तासाच्या आत छडा लावत अटक केली आहे.

दिनांक ५ जून रोजी रात्री ०३.०० वाजताच्या सुमारास गणपती गल्ली जुना जालना येथील एसबीआय बँकच्या एटीएम मशीनचे वायर तोडुन एमटीएम मशीन मधील रोख रक्कम अज्ञात आरोपींनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे फिर्यादी संतोष सत्यनारायण गारोल यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.


त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अवघ्या १२ तासात तांत्रिक विश्लेषण, माहितगार यांच्यकडून माहिती संकलित करुन अत्यंत शिताफिने आरोपी 1) आदित्य आनंद नवगिरे (वय-21 वर्षे), रा. सुवर्णकारनगर, जालना 2) धनंजय अशोक उदावंत (वय-20 वर्ष), रा. गणपती मंदीरच्या पाठीमागे, सुवर्णकार नगर, जालना व 3) राहुल राजकुमार मुख्यदल, (वय 23 वर्ष), रा. गणपती मंदीरजवळ, सुवर्णकार नगर, जालना यांना ताब्यात घेतले आहे.

त्यांची विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, रामप्रसाद पव्हरे यांनी केली आहे.

Related posts

Supreme Court Rejects Hemant Soren’s Bail Plea in Money Laundering Case

editor

आरोपीला फायदा पोहविण्यासाठी पुणे पोलिसांकडून तपासात मुद्दाम घोळ – विजय वडेट्टीवार

editor

टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या नावाने चंद्रपुरात देहविक्रीचा व्यवसाय

editor

Leave a Comment