Education national

झाडगावच्या राधा हिची दिल्लीतील शिव नादर विश्वविद्यालयात एम.ए. रुरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी झाली निवड

Share

यवतमाळ , १३ जून :

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील राधा नरेशराव देशमुख हिची दिल्लीच्या शिव नादर विश्वविद्यालयात एम.ए. रुरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

राधा दुर्गम भागातून दिल्लीसारख्या मोठ्या शहरात पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणार आहे. शेतमजुराची कन्या दिल्लीत ग्रामविकासाचे धडे गिरविणार आहे. अतिशय संघर्षमय जीवनातून पुढे आलेल्या अल्पभूधारक कुटुंबातील अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राधा हिने आपले पदवीचे शिक्षण यवतमाळ येथील सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयातून पूर्ण केले.

दिल्ली येथे विद्यापीठात ग्राम विकासाचे धडे गिरविण्याची संधी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मिळाली आहे. विद्यापीठाने तिला संपूर्ण खर्चासाठी ११ लाख रुपयाची शिष्यवृत्ती प्रदान केली आहे.

Related posts

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मे पासून भरता येणार

editor

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा

editor

गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार ! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक

editor

Leave a Comment