मुंबई,१७ जून :
नागपूर येथून एक दु:खद बातमी समोर आली आहे, ज्यात २ लष्करी जवानांचा मृत्यू झाला असून एकूण७ जण जखमी झाले आहेत त्यापैकी ३ जवानांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात नागपूरच्या ग्रामीण भागात कन्हान येथे घडला असून, कन्हान पुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो आणि बसमध्ये जोरदार धडक झाली.
अपघात एवढा भीषण होता की, ऑटो चक्काचूर झाला. या अपघातात ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. चालक आणि शिपाई जखमी झाले असून त्यापैकी तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे. विघ्नेश जी आणि धीरज रॉय अशी या मृतक जवानांची नावे आहेत
रविवारी कामठी कॅन्टोन्मेंट येथील आर्मीच्या गार्ड रेजिमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये रिफ्रेश ट्रेनिंगसाठी आले होते. एकूण १५ सैनिक दोन ऑटोमधून बाजारात गेले होते, त्यापैकी एका ऑटोमध्ये ८ तर दुसऱ्या आटो मध्ये ७ सैनिक होते आणि एक ऑटो कन्हान नदीवरून जात असताना हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चालकासह बसला ताब्यात घेतले आहे.