politics

राज्यसभा मिळाली नसल्याने भुजबळांच्या नाराजीला वडेट्टीवार, अनिल देशमुख यांचा दुजोरा

Share

मुंबई प्रतिनिधी ,१६ जून :

छगन भुजबळ यांना लोकसभा किंवा राज्यसभेवर जायचे होते, परंतु अजित पवार गटाकडून त्यांना संधी मिळाली नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चेला काँग्रेस नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची लढवण्याची इच्छा होती. परंतु महायुतीमधील वादामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर राज्यसभेची पोटनिवडणुकीसाठी त्यांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त केली. त्यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.

यावर विजय वडेट्टीवर यांनी छगन भुजबळ यांच्यासंदर्भात गौप्यस्फोट केला. भुजबळ यांची राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याची इच्छाच नव्हती, असे त्यांनी आपणास खासगीत सांगितले होते, असे वडेट्टीवार म्हणाले.

छगन भुजबळ पक्षात वरिष्ठ असताना त्यांना डावलले गेले. कारण तिकडे साठमारी होत आहे. त्यांच्या पक्षात ज्यांना जे मिळेत ते ते ओरबडून खाल्ले जात आहे. त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, असे करण्यात अर्थ नाही. आता भुजबळ यांनी एक घाव आणि दोन तुकडे करावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

अनिल देशमुख म्हणाले, भुजबळ सीनिअर नेते आहेत. संसदेत जाण्याची त्यांची इच्छा होती, मात्र त्यांना लोकसभा किंवा राज्यसभा मिळाली नाही. आज जरी ते बाहेर खुलेआमपणे बोलत नसतील पण मनातून ते दु:खी आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले.

Related posts

आता चाळीसगावचं पार्सल चाळीसगावला पाठवायचा आहे खडसेंच्या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांचे प्रतिउत्तर

editor

मोदी सरकारने नेहमीच कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणाची धोरणे राबवली: पियुष गोयल

editor

राहुल गांधीच्या वक्तव्याचा भाजप कडून निषेध

editor

Leave a Comment