मुंबई दि।१८ जून :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हा मुद्दा महत्वाचा झाला आहे. कारण अलीकडेच एका चायनीजच्या टपरीत सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एका बेकायेशीररित्या सिलेंडर आणि त्याची सुरक्षितता हे विषय समोर आल आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुरानी जाखड यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. आता शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणाऱ्या सिलेंडरवर कारवाईला सुरुवात झाली आहे.
केडीएमसीच्या क प्रभाग क्षेत्रात आतापर्यंत २८ बेकायदेशीरपणे वापरण्यात येणारे सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कारण अशा सिलेंडर मुळे रस्त्यावरील नागरिक आणि इतर ठिकाणीही सुरेक्षेचा मुद्दा उपस्थित होतो असे अखेर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या गॅस एजंस वर सुद्धा कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसात कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल असे प्रशासनानं स्पष्ट केले आहे.