डोंबिवली, दि.१९ जून : सुचिता भैरे
कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतील एका नामवंत शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागते ही आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद गोष्ट आहे अशी संताप जनक प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, ज्याप्रकारे मेट्रोचे काम बेशिस्तपणे सुरू आहे, तिथे मागच्याच आठवड्यात मी पाहणी केली होती व बोललो होतो की ज्या प्रकारे काम सुरू आहे तिथ शंभर टक्के वाहतूक कोंडी होणार आहे परंतु तिथून अवजड वाहने अजूनही बंद केलेली नाहीत . तेथिल काही शेतकऱ्यांना जागेचा मोबदला दिला नाही आहे, त्यामुळे हे काम रखडलेला आहे . हा जो रस्ता आहे तो एमएमआरडीएचा, मेट्रो एमएमआरडीए ची परंतु यांच कुठलच नियोजन तिथे दिसत नाही. दोन महिन्यापूर्वी येथे स्ट्रीट लाईटचे पोल लावले,मध्ये रस्ता केला, डिव्हाइडर केला आणि आता तो काढून टाकला म्हणजे हा जनतेच्या पैशाची नासाडी चालू आहे .यlसाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना फोन केला होता की यासाठी बैठक घ्यावी लागेल, पर्यायी रस्ते काढल्याशिवाय इथे काम सुरु करु नये .