Mahrashtra politics

महाराष्ट्रात पेशवाई आणण्याचा प्रयत्न कदापी खपवून घेणार नाही…..?

Share

प्रदेश काँग्रेसचा सरकाराला इशारा…

मुंबई प्रतिनिधी , २४ जून :

नाशिकमध्ये दलित समाजाविरोधात पत्रके वाटण्यात आली असून चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा हा प्रयत्न दिसत असून पत्रकातील भाषा पाहता महाराष्ट्रात पेशवाई आणण्याचा काही समाज विघातक लोकांचा प्रयत्न दिसत आहे पण तो हाणून पाडू, असा सणसणीत इशारा काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना राज्य सरकाराला दिला.

शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक द्वेष पसरवणारे जातीवाचक प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत या आपल्या इशाऱ्याचा पुनरुच्चार करतानाच, पटोले यांनी यावेळी राज्यातील सत्तारूढ भाजप प्रणित महायुती सरकारवर सडकून टीका केली.नाशिकमध्ये दलित समाजाच्या विरोधात वाटण्यात आलेले पत्रक हा या समाजाचा अपमान करणारेच असून अशा प्रकारच्या घटना सरकारच्या आशिर्वादाने होत असतील तर त्या तातडीने थांबवा आणि ज्यांनी हे पाप केले आहे त्यांच्या मुसक्या आवळून कठोर शिक्षा करा. कारण या पत्रकावर ते प्रसिद्ध करणाऱ्याचे नावही आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून अशा प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. काँग्रेस अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करत असल्याचेही पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरक्षण प्रश्नी भाजप मराठा व ओबीसी समाजाची फसवणूक करत असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ५० टक्केच्या वर आरक्षण टिकत नाही असे सांगत आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र ५० टक्क्याच्या वर आरक्षण देता येते असे म्हणत आहेत.भाजपाच्या दोन नेत्यांमध्ये आरक्षणप्रश्नी दोन मते आहेत.त्यामुळे आरक्षण प्रश्नी नेमकी भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करावे. कारण आता आरक्षणावरून भाजपाचा खरा चेहरा उघडा पडला असून बावनकुळे व फडणवीस यांच्या भूमिकेतील तफावत पाहता स्पष्ट होत असल्याकडे पटोले यांनी यावेळी पत्रकारांचे लक्ष वेधले.

Related posts

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपदग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- मंत्री अनिल पाटील

editor

आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

British PM Rishi Sunak Clarifies Call for July 4 Snap Elections

editor

Leave a Comment