Civics

डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील नागरिकांनी पाण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव

Share

कल्याण,२५ जून :

डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी पाखळे यांना घेराव घातला आहे. आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत रहायचे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणी पुरवठा डोंबिवली विभाग अधिकारी चंद्रकांत पाखळे यांना जाब विचारला.

जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असे यावेळी संतप्त नागरिकांनी सांगितले आहे. तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा करायला समास्या निर्माण होत असून एक-दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल अशी प्रतिक्रिया केडीएमसी पाणी पुरवठा अधिकाऱ्याने दिली आहे.

Related posts

ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी यासाठी दोन टोगो व्हॅन शहराच्या सेवेत दाखल

editor

झोपू योजनेतील घरे विकण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार – मंत्री अतुल सावे

editor

विधान परिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

editor

Leave a Comment