Education national

बुलढाण्याचा १८ महिन्यांचा अंशिक ठरला आयबीआर अचीव्हर; अंशिकच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

Share

मुंबई प्रतिनिधि,२५ जून :

बुलढाणा येथील १८ महिन्याचा अंशिक अनुप गव्हाळे हा चिमुकला अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर पाळीव प्राणी, जंगली प्राणी, फळे, भाजी, वाहतूकीची साधणे, विविध रंगासह पक्ष्यांची नावे आणि ओळख अचूक सांगतो. त्याच्या या तल्लख बुद्धीची दखल घेत त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये आयबीआर अचीव्हर म्हणून नोंदविण्यात आले आहे.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणतात आणि या म्हणीला बुलढाणा येथील अंशिक अनुप गव्हाळे हा अवघ्या १८ महिन्यांच्या मुलाने सत्यात उतरवले आहे. अंशिक १८ पाळीव प्राण्यांची नावे, १८ जंगली प्राण्यांची नावे, १२ पक्षांची नावे, १६ फळांची नावे, १२ हिरव्या भाज्यांची नावे, १० वाहतुकीच्या साधनांची नावे, ४ रंगांची नावे ओळखून अचूक सांगतो. एवढेच नव्हेतर काही प्राणी आणि पक्षांचे हुबेहुब आवाजही काढून दाखवतो. विशेष म्हणजे मणुष्यप्राण्याच्या शरीराच्या सर्व अवयवांची नावे देखील त्याला तोंड पाठ आहेत. अंशिकच्या या अफाट स्मरणशक्तीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असून त्याची नोंद ‘आयबीआर अचीव्हर‘ म्हणून करण्यात आली आहे

Related posts

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल – मंत्री लोढा

editor

एक्झिट पोल नंतर शेअर बाजारात तेजी

editor

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी कोचिंग क्लासेस संघटनेकडून अमोल जगताप यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

editor

Leave a Comment