Culture & Society

३१५ वर्षाची परंपरा असलेली आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी आज जालनात दाखल झाली

Share

मुंबई प्रतिनिधि ,२७ जून :

वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मानाचा असा आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचे आज जालना जिल्ह्यात आगमन झाले. खान्देश, विदर्भ,मराठवाडा असा ६ जिल्ह्याचा या पालखी सोहळ्याचा प्रवास आहे.

महाराष्ट्रातील जे मानाचे पालखी सोहळे आहेत यामध्ये स्त्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याच्या मोठा मान आहे. महिलांची पालखी म्हणून या पालखीकडे पाहिले जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आसल्याचे पहावयास मिळत आहे. सात वर्षे वया पासून सत्तर वर्षे वयांचे भाविक भक्तांचा पालखी मध्ये सहभाग आहे.

साधारतः पंधराशे पेक्षा आधिक भाविक भक्त असलेल्या या पालखीचा २९ दिवसांचा प्रवास आहे.अडिचशे कि.मी.चा प्रवास पुर्ण झाला असून जालना,बीड,ऊस्मानाबाद आणि सोलापूर असा चारशे कि.मी.चा प्रवास करीत मुक्ताईची पालखी जोपर्यंत वाकडी येथे पोहोचत नाही तोपर्यंत बाकीच्या पालख्या तिथून प्रस्थान करत नाहीत. ज्यावेळेस मुक्ताबाईची पालखी वाकडी येथे पोहोचते त्याच्यानंतरच सर्व पालख्या पंढरपूरला प्रस्थान करतात.

निर्मल वारी, हरित वारी, सुरक्षित वारी” या ब्रीद वाक्याच्या अंतर्गत शासनाकडून यावर्षी पालखी सोहळ्यासाठी विविध सुविधा पुरविण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच मोबाईल शौचालय, स्वच्छतागृह याची सुद्धा व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. असे विशेष स्वरूपात शासनाने लक्ष दिलेले आहे. या सोहळा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने चहा पाणी तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Related posts

प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा चालू झाल्यास गोरक्षण होईल ! शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग

editor

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी; तर मुंबई जिल्ह्यात माहीम, विलेपार्ले आणि खारघर (नवी मुंबई) येथे’गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न ! ‘

editor

शिवसंस्कार घडवणारी ‘शिवसृष्टी’!

editor

Leave a Comment