national politics

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांची भेट

Share

मुंबई प्रतिनिधि, २ जुलाई :

शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाल्याबद्दल शिवसेना खासदारांनी आदरणीय नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विकास कामांचा आढावा घेतला. शिवसेना खासदारांनी महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली.

खासदारांनी पंतप्रधानांना विठ्ठल रखुमाईची मुर्ती भेट दिली. पंतप्रधानांनी भेटी दरम्यान अर्धा तास खासदारांसोबत चर्चा केली. यावेळी खासदारांनी सकारात्मक आणि सक्रिय भूमिका ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Related posts

डोंबिवलीतील उबाठा गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

editor

बारामतीत १४ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व जाहीर सभा – सुनिल तटकरे

editor

सोशल मिडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

editor

Leave a Comment