Mahrashtra

रुग्णवाहिकेअभावी अन्यायग्रस्ताची तडफड ; सरकारकडे न्याय मागत असतानाच …अन्याय

Share

मुंबई / रमेश औताडे , ४ जुलाई :

आकडी ( फिट ) येऊन बेशुद्ध अवस्थेत तडफडू लागल्यानंतर पोलिसांची व बघ्याची गर्दी आझाद मैदानात होऊ लागली, मात्र सरकारने आझाद मैदानात रुग्णवाहिका न ठेवल्याने आंदोलनकर्ते भर पावसात संतप्त झाले होते.

राज्यभरातून लाखो आंदोलनकर्ते मुंबईत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आले आहेत. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात दिवसा उकाडा व सायंकाळी पाऊस असल्याने आंदोलनकर्त्यांची त्रेधातिरपीट उडत असताना स्त्री परिचर संघटनेच्या एका पुरुष आंदोलनकर्त्याला आकडी आली. कुणी चांमड्याची चप्पल त्यांच्या नाकाला लावली तर कुणी कांदा आणा म्हणून ओरडू लागले. पोलिस व बघ्यांची गर्दी वाढू लागली पत्रकारांच्या कॅमेरा क्लिक व आंदोलनकर्त्यांच्या मोबाईल क्लिक सुरू असताना तो अन्यायग्रस्त तडफडत होता.

या सर्व गडबडीत सरकारी रुग्णवाहिका मात्र मैदानात दिसत नव्हती. आज आकडी आली उद्या कुणालाहार्ट अटॅक आला तर सरकारकडे काय उपाय योजना आहे ? असा सवाल आंदोलनकर्ते करत होते. न्याय मागण्यासाठी येत असतानाच अन्याय होत आहे. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्ते करत होते

Related posts

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका

editor

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

editor

Samruddhi Mahamarg Nears Completion in Thane District

editor

Leave a Comment