Civics Mahrashtra

इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी वारकऱ्यांसह कष्टकरी जनता सरसावली

Share

६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

संत भूमी आळंदीतील हातभट्टी, मद्य अमली पदार्थ विक्रीसह बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी आंदोलनाचे आयोजन

पिंपरी प्रतिनिधी , ५ जुलै:

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर संत भुमीतील वारकरी, टाळकरी, मटकरी साधुसंत आणि कष्टकरी जनता आंदोलन करणार आहे. शनिवारी सहा जुलै रोजी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण करणारे आळंदी परिसरातील हातभट्टी, मद्य विक्री कंपनीतून सोडण्यात येणारे घताक सांडपाणी,बेकायदेशीर पब, खुले अम् विकले जाणारे अमली पदार्थ आणि इतर अवैध व्यवसाय बंद करून त्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होणार असल्याची माहिती कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.

या प्रश्ना बाबत चर्चा करण्यासाठी दिघी येथे साधुसंत, वारकरी, मटकरी, दिंडीत चालणारे भक्तगण यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला, नवनाथ भजनी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण मंदिर कृती समितीचे रोहन तापकीर, आदिशक्ती मुक्ताबाई मंदिराचे अध्यक्ष अमोल पाटील,उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करून संत भूमीत चालणाऱ्या अवैध व्यवसायाकडे पोलिसांचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला.

आंदोलनास रिपब्लिकन युवा मोर्चा राष्ट्रीय नेते राहुल डोंबाळे, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, रिपब्लिकन पार्टी वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजित शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते सुरेश निकाळजे ,भिमशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे, अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष रफिकभाई कुरेशी, अंमली पदार्थ विक्री विरोधी समितीचे विल्यम्स साळवी, टपरी,पथारी, हातगाडी, पंचायतचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे, घरकाम महिला सभा, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, बहुजन वारकरी सेवा संघ,सह ४० ते ५० संघटनाने पाठिंबा दिला आहे. व आंदोलनामध्ये उपस्थित राहणार आहेत,

बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली की, पवित्र संत भूमी आळंदी मध्ये हातभट्टी, दारूचे अड्डे, मटका, जुगार, वेश्या व्यवसाय, अंमली पदार्थाची विक्री राजरोसपणे चालू आहे. या बरोबरच या संत भूमी परिसराच्या जवळच असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात देखील बेकायदेशीर पब, बार, अंमली पदार्थाचे अड्डे सुरू आहेत. ते उद्ध्वस्त करून ते चालविणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.


पवित्र इंद्रायणी दूषित करण्याचा प्रयत्न या अवैध व्यवसाय करणाऱ्यांमुळे होत आहे. आळंदी येथे यंदा आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भावी दाखल झाले होते. भाविकांनी इंद्रायणी मध्ये स्नान केले. तसेच तीर्थ समजून ते प्राशन केले. परंतु यामुळे त्यांच्या शरीरावरती घातक परिणाम झाला आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. याबाबत निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

पुणे येथे अंमली पदार्थ, पब, बार प्रकरणी मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये डान्सबार व इतर विविध ठिकाणी अंमली पदार्थ व इतर बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. याबाबत मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यामुळे या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी व पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

Related posts

मुंबई मनपाच्या ढिम्म कारभारामुळे महिला गंभीर जखमी

editor

धारावी प्रकल्पातील महसूल जमीन हस्तांतराची श्वेतपत्रिका जाहीर करू – विखे-पाटील

editor

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण ; गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले : विधिमंडळात आर्थिक पाहणी अहवाल सादर

editor

Leave a Comment