Civics Mahrashtra

डोंबिवली मधील हाय प्रोफाईल उच्च गृहसंकुलात पाण्याचा ठणठणाट

Share

कल्याण प्रतिनिधि, ८ जुलाई :

एकीकडे कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे मात्र शहरांमध्ये पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षात कल्याण डोंबिवली मध्ये अनेक मोठे प्रकल्प आकाराला येत आहे लाखो रुपये खर्च करून नागरिक मोठ्या आशेने या ठिकाणी घर खरेदी करताना दिसतात . मात्र प्रत्यक्षात काही दिवसांनी नागरिकांचा हिरमोड होताना दिसतोय याचा कारण म्हणजे कल्याण डोंबिवली शहरातील पाणीटंचाई.

डोंबिवली पूर्वेकडील रीजन्सी आनंद या मोठ्या गृह संकुलात देखील पाणीटंचाईने रहिवासी हैराण झालेत . रविवारी सकाळी पाणीटंचाई विरोधात इथले रहिवासी अखेर रस्त्यावर उतरले. यावेळी रहिवाशांनी संबंधित विकासाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र विकासाच्या बाउंसरने या रहिवाशांना अडवले . त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचा वातावरण निर्माण झालं होतं यापूर्वी देखील पाणीटंचाईमुळे इथल्या रहिवाशांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती . आता पुन्हा पाणीटंचाई निर्माण होत असल्याने रहिवाशी चांगले संतापले यावेळी बिल्डरच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली ; त्यासोबतच पाणीपुरवठा करण्याविषयी बिल्डरने लेखी आश्वासन द्यावे अशी आग्रही भूमिका रहिवाशांकडून घेण्यात आली. आम्ही घर घेताना विकासाकडून अनेक आश्वासन देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात तसं काही होत नसून साधा पाणीपुरवठा ही आम्हाला नीट होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली .


या गृह संकुलात जवळपास ४००० नागरिक राहत आहेत त्यातील जवळपास अडीच ते तीन हजार नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले पाण्या संबंधात चा विचारण्यासाठी विकासाच्या कार्यालयात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला , मात्र बाउन्सरने त्यांची वाट अडवली यावेळी काही प्रमाणात धक्काबुक्की सुद्धा झाली. अखेर काही वेळानंतर विकासक आणि रहिवासी यांच्यामध्ये चर्चा झाली . यावेळी दावेप्रति दावे देखील करण्यात आले विकासाकांकडून एमआयडीसी कडे बोट दाखवण्यात आलं असं नागरिकांकडून सांगण्यात आलं . मात्र आम्ही एमआयडीसी कडे नाही तर बिल्डरांकडे बघून घर घेतली अशी उत्तरं नागरिकांनी यावेळी विकासाकांना दिली . त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात यावर काय तोडगा निघतो ते पाहावं लागेल मात्र यावर लवकर तोडगा निघाला नाही तर आम्ही रस्त्यावर बसू असा इशारा नागरिकांकडून देण्यात आलेला आहे. रीजन्सी अनंतनाम मध्ये तीन ते चार विकासक एकत्र आहे त्यापैकी एका बिल्डरने माध्यमांना प्रतिक्रिया देत आपलं म्हणणं सांगितला आहे.

रीजन्सी अनंता प्रोजेक्ट हॅन्ड ओव्हर करून अडीच ते तीन वर्षे झालेली आहे. लोकांच्या रिक्वायरमेंट पेक्षा आम्ही जास्त पाणीपुरवठा एमआयडीसी कडून मंजूर करून ठेवलेला आहे एमआयडीसी कडून सुरळीत पाणीपुरवठा सुरू होता मात्र गेल्या एक दीड महिन्यापासून सर्विसिंगच्या कारणामुळे इतर कारणामुळे एमआयडीसी कडे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे विकासक संतोष डावखरे यांनी सांगितलं.पाणीपुरवठा लवकर सुरू होईल असा आश्वासन सुद्धा अधिकारी देत आहेत. जेवढा पाणीपुरवठा आम्ही मंजूर केला होता त्यापैकी २५ ते ३० टक्केच पाणीपुरवठा ते देऊ शकत आहे.नागरिकांना या गोष्टीचा त्रास होत असल्यामुळे नागरिक आमच्याकडे आले होते. शनिवार रविवार एमआयडीसीचे कार्यालय बंद असतात त्यामुळे नागरिक आले. इथे राहणारे नागरिक आमचे आहे त्यांना कोणताही त्रास नाहीये पाण्याचा झालेला त्रास तात्पुरत्या स्वरूपाचा आहे.पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमीच पाठपुरावा करत असून आमचे प्रयत्न सुरूच आहे अस डावखर यांच्याकडून सांगण्यात आले

Related posts

सरकार मधून मला मोकळा करा पक्षाकडे विनंती – देवेंद्र फडणवीस

editor

निवडणूक देणगीसाठी ठाकरे गटाची उठाठेवशिंदे गटाच्या संजय निरुपम यांचा आरोप

editor

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खो खो क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या प्रशिक्षक, खेळाडू यांचा सत्कार

editor

Leave a Comment