Civics

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील मुंबईतील पूरस्थितीचा आढावा

Share

मुंबई, प्रतिनिधी दि. ८ जुलाई :

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा कोलमडली आहे. मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा धिम्या गतीने चालू आहे. तसेच रस्ते देखील जाम आहेत. अनेक रस्ते आणि चौकांमध्ये पाणी साचलं आहे.

तसेच शहराच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ‌. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते

मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related posts

Thane Police Seize Illegal Weapons Ahead of Lok Sabha Elections

editor

विधान परिषदेच्या निवडणुकीत युती-आघाडीत बिघाडी : कोकण पदवीधरमधून मनसेची माघार

editor

दुधाला हमीभाव देण्यासाठी मंत्री विखे पाटील यांची केंद्राकडे मागणी

editor

Leave a Comment