Mahrashtra

आमदार नागपूर विमानतळावर अडकले

Share

नागपूर , ८ जुलाई :

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. दरम्यान रविवारी रात्री मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मुंबई तुंबली आहे. त्याचा परिणाम विधिमंडळाच्या कामकाजावर देखील झाला. आमदार विधानभवनात वेळेत पोहोचू न शकल्याने कामकाज स्थगित करण्यात आले.

विधीमंडळाचे अधिवेशन चालू असल्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांमधून मुंबईकडे येणारे आमदार आणि मंत्रीदेखील या पावसात अडकले आहेत. त्यामुळे त्यांनाही विधीमंडळ गाठणे अवघड झाले आहे.विदर्भातील आमदार आज सकाळी मंबईकडे जाण्यासाठी नागपूर विमानतळावर पोहोचले. परंतु मुंबई तुंबल्याने मुंबईहून येणारे विमान आले नाही. हेच विमान पुढे मुंबईकडे रवाना होणार होते. तिकडून येणाऱ्या विमानाला विलंब झाल्याने आमदारांना मुंबईला वेळेत जाणे शक्य नाही. अनेक आमदार नागपूर विमानतळात ताटकळत बसले होते. यामध्ये आमदार प्रतिभा धानोरकर, रवी राणा, देवेंद्र भुयार आणि सुभाष धोटे यांचा समावेश होता.

याशिवाय रेल्वेगाडीने मुंबईकडे निघालेल्या आमदारांना देखील पावसाचा फटका बसला. रेल्वे रुळावर पावसाचे पाणी साचल्याने तसेच काही भागात दरड कोळसल्याने ठिकठिकाणी रेल्वेगाड्या थांवबण्यात आल्या. दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह अनेक आमदार रेल्वेने मुंबईला येत होते. मात्र ते ज्या एक्सप्रेसने मुंबईला येत होते, ती एक्सप्रेस कुर्ला आणि दादरच्या मध्ये अडकल्याने इतर प्रवाशांप्रमाणे मंत्री व आमदार रेल्वेतून खाली उतरले आणि रेल्वे रूळावरून चालत मुंबईच्या दिशेने निघाले. विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांना देखील रेल्वेगाडीतून खाली उतरावे लागले. हे सर्व मंत्री, आमदार कसेबसे विधानभवन गाठण्याचा प्रयत्न करीत होते.

Related posts

ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपला

editor

अनधिकृत पेट्रोल पंपाला परवानगी देणाऱ्या त्या’ अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी आ. दरेकरांची मागणी

editor

लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले

editor

Leave a Comment