Share
मुंबई प्रतिनिधि,९ जुलै:
महाविकास आघाडीचे नेते , राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी राजभवन येथे पोहोचले आहेत.विधान परिषदेतील सभापती पद रिक्त आहे. याबाबत लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहेत. याशिवाय राज्यातील इतर विषयांसंदर्भात देखील राज्यपालांसोबत चर्चा केली जाणार आहे.
आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अनिल परब, अंबादास दानवे, जयंत पाटील, भाई जगताप, सतेज पाटील, अजय चौधरी, ज मो अभ्यंकर, रमेश कोरगावकर, सुनील शिंदे राजभवन येथे उपस्थीत आहेत