politics

‘ मीडियाशी जास्त बोलू नको ‘ – वळसे पाटलांचा रोहित पवारांना सल्ला

Share

मुंबई, दि. ११ प्रतििनधी :

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यानिमित्ताने विविध पक्षांच्या नेते आमदारांच्या गाठीभेटी विधिमंडळ परिसरात होत असतात. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची भेट विधानमंडळ परिसरात झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी जास्त न बोलण्याचा सल्ला वळसे पाटील यांनी रोहित पवार यांना दिला. रोहित पवार यांनी भेटीत वळसे पाटील यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूसही केली.

राज्याचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विधिमंडळाच्या कामकाजासाठी गुरुवारी दिवसभर आमदारांना विधिमंडळ परिसरात, सभागृहात यावे लागले आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला (शुक्रवारी) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.

अशातच रोहित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची भेट झाली.रोहित, मीडियाशी जास्त बोलू नको, ते अडचणीत आणतात, असा सल्ला वळसे पाटील यांनी दिला. त्यांच्या सल्ल्यावर रोहित पवार यांनीही खोचक उत्तर दिले. मी पत्रकारांशी गप्पा मारत होतो, जे बोलायचे तेच मी त्यांच्याशी बोलतो. तसेही अधिवेशनात आम्हाला फार बोलू दिले जात नाही, असे रोहित पवार म्हणाले. त्यांच्या उत्तरावर वळसे पाटील यांनी स्मितहास्य केले.

Related posts

महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लीम आमदार नाही ! समाजवादी पार्टीचे मविआ नेत्यांना पत्र

editor

बच्चू कडुंनी तात्कालिक उद्वेग करून वागू नये :भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचा मैत्रीचा सल्ला

editor

Supreme Court Declines Urgent Hearing for Arvind Kejriwal’s Bail Extension Plea

editor

Leave a Comment