Culture & Society

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी; तर मुंबई जिल्ह्यात माहीम, विलेपार्ले आणि खारघर (नवी मुंबई) येथे’गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न ! ‘

Share

‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

  मुंबई , दि २२ :


 काळमहिम्यानुसार रामराज्य येणारच आहे. जसे ‘पहाट होणे’ कुणी थांबवू शकत नाही, तसे ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचे निर्माण’ कुणीही थांबवू शकत नाही. ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. रामराज्याचे आपल्याला साक्षीदार नाही, तर साथीदार व्हायचे आहे. आपणही रामराज्यात रहाण्यासाठी साधना करत धर्माचरणी बनले पाहिजे. आजच्या भाषेत सांगायचे, तर ‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे. सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो. आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची ओढ असो वा नसो, एक चांगले समाधानी जीवन जगता येण्यासाठीही साधना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधना करण्याचा आणि ती वाढवण्याचा संकल्प करूया.” असे प्रतिपादन  हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी ‘आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना’ या विषयांवर मार्गदर्शन करतांना केले. ते सनातन संस्थेच्या वतीने माहीम येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. सनातन संस्थेच्या वतीने मुंबई जिल्ह्यात माहीम, विलेपार्ले आणि खारघर (नवी मुंबई) येथे, तसेच देशभरात एकूण ७५ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

     माहीम येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात मार्गदर्शन करताना सर्वाेच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय म्हणाले, 'हिंदू निद्रिस्त राहिले तर भारताचे इस्लामीकरण होण्यास विलंब लागणार नाही. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे तेजस्वी संत मी आतापर्यंत पाहिले नाही. समस्त हिंदूंनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत व्हावे !' महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. ठिकठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते. या महोत्सवांत धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले. गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ सुद्धा दाखवण्यात आली.

६ भाषांमध्ये 'ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजरात, तमिळ, मल्याळम् या ६ भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.

Related posts

मंदिरं सामाजिक समतेची केंद्र व्हावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा

editor

पुण्यात घरगुती गणपती समोर साकारलाय मनोज जरांगे पाटलांचा देखावा

editor

Leave a Comment