Civics

आमदार कैलास गोरंट्याल यांचा कार्यकर्त्यांसह महापालिकेत ठिय्या, सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलाचा गोरंट्याल यांचा इशारा

Share

जालना, दि. २२ :

जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह महापालिकेत ठिय्या आंदोलन केलंय. शहरातील नागरिकांना सुविधा मिळत नाही. वेळेवर नळाला पाणी येत नाही, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, डेग्यूंच्या रुग्ण संख्येत वाढ आहे. त्यामुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं असून नागरिकांना सुविधा पुरवण्याच्या अनेक सुचना गोरंट्याल यांनी आयुक्तांना दिल्या होत्या.

मात्र महापालिकेनं याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळं कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह महापालिकेत येवून ठिय्या दिला आणि महापालिकेची ग्रामपंचायत म्हणून घोषित करा अशी मागणी गोरंट्याल यांनी केली. दरम्यान पुढच्या आठ दिवसात नागरिकांना सुविधा नाही पुरवल्या तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गोरंट्याल यांनी दिला आहे.

Related posts

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र अकराव्या स्थानीमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

editor

Swati Maliwal’s Battle for Justice: Standing Alone Against AAP’s Pressure

editor

शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली; दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान

editor

Leave a Comment