मुंबई, दि. २२ :
अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराबाबत केलेल्या टीकेनंतर जयंत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, असून विरोधकांना अमित शहा यांच्या बोलण्यात तथ्य होतं हा शब्द प्रयोग वापरावा लागेल जे आमच्याकडून निघून गेले. ते आता त्यांच्या वळसळणीने जाऊन बसले आहेत. यामुळे शरद पवार यांच्यावर झालेला एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही. त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झालेत त्यांनी कधीही चुकीचे काम केलेले नाही.त्यामुळे त्यांना भ्रष्टाचारी म्हणणं हा विनोद आहे . महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा अमित शहा यांनी गाठली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे नेते जिथे कुठे दिसतील.तिथे त्यांना ठोका या केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी फडणवीसां वर टीका केली असून बुद्धिमत्ता आणि तत्व यांच्या जोरावर विरोधकांना हरवता येणे शक्य नाही.म्हणून आता हात घाई वर या असा संदेश त्यांनी दिलेला दिसत आहे, अशी उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
देशाच्या जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात बेरोजगारी कमी करण्यासाठी उपयोजना झाल्या पाहिजेत.तसेच शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी देखील ठोस निर्णय घेतले पाहिजेत अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली.