Share
कल्याण , दि. २३ :
कल्याण-नगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे त्यामुळे पुलावर वाहतूककोंडी होत असून या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. यात वाहनांचे देखील नुकसान होत आहेत.
कल्याण-मुरबाड मार्ग पुढे माळशेज घाटमार्गे नगरकडे जातो. त्यामुळे हा मार्ग तसेच त्यावरील शहाड रेल्वे उड्डाणपूल हा महत्त्वाचा आहे. या पुलावर पावसाळ्यात खड्डे पडले आहे. तर पुलावरील गर्डर देखील बाहेर आले आहेत. खड्डे आणि गर्डरचे झटके खात वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सकाळ-सायंकाळ वाहनचालकांना पुलावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो आहे. प्रशासनाने या समस्येकडे लवकर लक्ष द्यावे व खड्डे बुजवावेत शी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.