politics

खासदार प्रणिती शिंदे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात अक्कलकोटच्या विकासकामांच्या मुद्द्यावरून वाकयुद्ध

Share

सोलापूर , दि. 15 नोव्हेंबर:

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे अक्कलकोटचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

“भाजपच्या त्रासाला आणि त्यांच्या आमदाराला तुम्ही वैतागला आहात,हे आमदार फक्त जीआर वर आहेत.बाकी अस्तित्वात कांही दिसत नाही.बाराशे – तेराशे कोटींचा निधी हा फक्त कागदावर आहे.मागच्या 5 वर्षात अक्कलकोट तालुक्यात कांहीच विकासकामे झालेली नाहीयेत.त्यामुळे भाजपकडे माणुसकी आणि संस्कृती नाहीये.एकीकडे महिलांवर बलात्कार करतात,चार वर्षांच्या लहान मुलीला पण सोडत नाहीत.आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना आमिष दाखवून मत विकत घेण्याचं काम भाजप करत आहे.त्यामुळे त्यांना कधीच माफी नाहीये.भाजपने साम,दाम,दंड,इडी,सिबीआय वापरल तरी विजय हा काँग्रेस आणि लोकशाहीचा होणार आहे.आता कोणीही किंगमेकर नसून जनताजनार्दन किंगमेकर ठरणार आहे.”

दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांच्या टिकेला भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जोरदार प्रतिउत्तर दिल आहे.


“खासदार शिंदे यांना विनंती आहे की,त्यांनी मुंबई सोडून एकदा अक्कलकोट मध्ये यावं.अक्कलकोट मध्ये किती काम झाले हे बघण्यासाठी मी स्वतः त्यांना घेऊन फिरतो.प्रणिती शिंदे यांची अडचण आहे की,त्या मुंबईत राहत असल्यामुळे मतदारसंघातील विकासाची कामं त्यांना माहिती नाहीत.विधानसभा निवडणुकीत त्यांनी काहीतरी भाषण करायचं म्हणून केल असेल.मात्र काँग्रेसच मूळ दुखणं ही ‘लाडकी बहीण’ आहे. खासदार शिंदे यांच्याकडून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.विकासाचं नवीन परफेक्शन भाजपकडून सेट करण्यात आल आहे.भाजपच्या काळात कधीही दंगली झाल्या नाहीत.उलट काँग्रेसच्या काळात दंगली आणि बॉम्बस्फोट झाली आहेत. त्यामुळे खासदार शिंदे निवडून येऊन विकासाबाबत काही बोलू शकल्या नाहीत.सध्या दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघात ताळमेळ नसलेली आघाडी दिसून येत आहे.त्यामुळे निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार येणार आहे.”

Related posts

Swati Maliwal’s Battle for Justice: Standing Alone Against AAP’s Pressure

editor

आमदार पी. एन. पाटील यांचं निधन, वयाच्या 71 वर्षी घेतला अखेरचा श्वास

editor

राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांची यादी: उच्च न्यायालयाचा ठाकरेंना धक्का, महायुती सरकारला दिलासा

editor

Leave a Comment